महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सुबोध कुमार जयस्वाल यांची बदली करण्याचा प्रयत्न - चंद्रकांत पाटील.शनिवार, दि. ७ :  हे महा विकास आघाडी सरकार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री. सुबोध कुमार जयस्वाल यांची बदली करण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी  विकास आघाडी सरकारवर केली आहे.  ते असे म्हणाले की, आता काही वेळापूर्वीच एक धक्कादायक आणि दुःखद बातमी वाचली. राज्याचे सर्वोच्च पोलीस अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक  सुबोध कुमार जयस्वाल जी हे आपल्या पदावरून पायउतार होऊन केंद्रीय सेवेत जाणार आहेत. येणाऱ्या काळात देशाच्या पराक्रमी अशा राष्ट्रीय सुरक्षा बल (एनएसजी) च्या सर्वोच्च पदी विराजमान होणार आहेत अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

राज्यातील गेल्या काही महिन्यांमधील घटनांमुळे श्री. जैस्वाल यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भावनांना धक्का पोहोचला आहे. या महाभकास आघाडीच्या सरकारने सर्व धोरणांना बाजूला सारून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. भारताची गुप्तचर संघटना 'रॉ'मध्ये काम केल्यानंतर सर्वप्रथम 2018 साली श्री. जयस्वाल यांनी मुंबई पोलीस आयुक्ताचा पदभार सांभाळला. 

सरकार इतकी बहिरी आणि कुचकामी आहे की, पोलीस दलाला मजबूत करण्यासाठी श्री. जयस्वाल यांच्या सर्व सूचना आणि उपाययोजना धुडकावून लावत होती. याशिवाय त्यांच्या शिफारसीच्या विरुद्ध पुर्वीच्या ज्या पोलिसांना निलंबित केले गेले होते त्यांनाही पुन्हा पदावर नेमले गेले. 

आमच्या राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी हा फारच घातक दिवस आहे की, त्यांच्यासारखा सक्षम अधिकारी राज्य सोडून जात आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये राज्याची कायदा आणि सुव्यवस्था ईश्वराच्याच हातात आहे.

Post a comment

0 Comments