मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीला आग

मुंबई : मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली होती . आज पहाटे पाचच्या सुमारास या ठिकाणच्या काही दुकांनांना आग लागली. दिवाळीच्या तोंडावर गर्दीच्या ठिकाणी ही लागली. आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचं साम्राज्य पसरलं होतं. त्यानंतर १२ , साडे बाराच्या सुमारास या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
क्रॉफर्ड मार्केटमधील अब्दुल रेहमान स्ट्रीट इथे चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग एल-टू लेव्हलची असल्याची माहिती आहे. मात्र, सध्या अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश आलं आहे.
क्रॉफर्ड मार्केट येथील ३१, ३२ अब्दुल रेहमान स्ट्रीट या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत मेडिसान, स्टॉकची चार दुकांनं जळून खाक झाल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. तसेच, या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पॅकिंग मटेरिअल आणि प्लास्टिकचं सामान असल्यामुळे आग पसरल्याचं सांगण्यात येत आहे.
क्रॉफर्ड मार्केटमधील अब्दुल रेहमान स्ट्रीट इथे चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग एल-टू लेव्हलची असल्याची माहिती आहे. मात्र, सध्या अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश आलं आहे.

Post a comment

0 Comments