शेतकऱ्यांनी चिंता करू नये, लवकरच आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळणार- मंत्री. संदीपान भुमरे.पैठण (प्रतिनिधी विजय खडसन )--- मंत्री.संदीपान भुमरे यांनी पैठण तालुक्यासह अन्य जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची पाहणी केली, त्या पाहणीत महाराष्ट्रातील पैठण तालुक्यासह औरंगाबाद, सोलापूर, सह अनेक जिल्ह्यात कपाशी, तूर, सोयाबीन, व फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असल्याचे मा.नामदार संदीपान भुमरे यांनी सांगितले, फळबाग व कपाशी सह तूर, मूग आदी खरीप पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने पैठण तालुक्यातील सर्व पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश  मंत्री भुमरे यांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना दिले होते, त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व पंचनामे जवळपास लवकरच पूर्ण होतील व तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. पैठण तालुक्याची एकत्रित आणेवारी ५५ असल्याचे प्राथमिक माहिती पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी  दिली आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत लवकरच मिळणार आहे. त्यामुळे आतिवृष्टीने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता चिंता करू नये.  यासाठी मी वेळोवेळी पाठपुरावा करत असल्याचे नामदार भुमरे यांनी सांगितले. 


स्वत: मी सोलापुर जिल्ह्यात काही ठीकाणी मा.उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री यांच्या सोबत व पैठण विधानसभा मतदार संघातील गावो-गावि जाऊन शेतातील उभ्या पिंकाचे अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी केलेली आहे.  उभ्या सर्व पिंकाचे नुकसान झालेले आढळलेले आसुन, त्या नुसार मि तहसिलदार व तालुका कृषि आधिकारी, यांना वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. फळ पिके असो की इतर पिके असो या सर्वांचे पंचनामे होऊन बाधित सर्व शेतकरी ज्यांच्या शेतातील पिकांचे खरोखरोच नुकसान झालेले आहे.त्या सर्व शेतकरी यांना निश्चित पणे अनुदान मिळणारच आहे.    त्या अनुंषगाने मि जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना वेळोवेळी या बाबतीत चर्चा केलेली आसुन महत्वपुर्ण सुचना दिलेल्या आहेत.  या मुळे पैठण मतदार संघासहीत सर्वच ठीकाणी शेतकरी यांनी निश्चित राहावे.                       आणि आपल्या नुकसान झालेल्या शेतकर्याना पिकांचे अनुदान लवकरच मिळणार आसल्याने,या अनुदानासाठी शासन स्तरावर माझा सतत पाठ-पुरावा करणे चालु आसुन कोन्ही या बाबत काळजी करु करु नये.असे ते म्हणाले

Post a comment

0 Comments