लोकं मेल्यावर लस येईल का? ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल.

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकं मेल्यावर लस येईल का? असा थेट सावल केला आहे.

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकं मेल्यावर लस येईल का? असा थेट सावल केला आहे. तसेच, अजित पवार यांनी दिवाळीत झालेल्या गर्दीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

  ते म्हणाले की, दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, असा टोला पुणेकरांना पवारांनी लगावला आहे.

ते पुणा येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी, अजित पवार यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी आम्ही तारेवरची कसरत करतोय. पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. कोरोनाच्या संकटामुळं विकासकामे थांबली आहे. 
शेवटी सगळी सोंग करता येतात मात्र पैश्यांचे सोंग करता येत नसल्याचे अजित पवार म्हणाले आहे.

तसेच ,अजित पवार यांनी कोरोनाची लस लोक मेल्यावर येईल का? असा सावला उपस्थित केला आहे. यावेळी अजित पवारांनी दिवाळीच्या काळात पुण्यातील बाजीराव रोड आणि लक्ष्मी रोड परिसरातील गर्दीवरुन पुणेकरांना चांगलेच झापले आहे. 

पवार म्हणाले की, दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, असे पवार म्हणाले.

Post a comment

0 Comments