निकिता तोमर हत्येप्रकरणी समस्त हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनवैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


आज 3 नोव्हेंबर ला वैजापुरात समस्त हिंदू समाजाच्या वतीने निकिता हत्याकांडाचा  जाहीर निषेध  करत नायब तहसीलदार महेंद्र गिरगे यांना  निवेदन देण्यात आले.                          
वैजापूर शहरातील संकटमोचन हनुमान मंदिरासमोर हरियाणा-वल्लभगढ येथे झालेल्या निकिता तोमर या तरुणीच्या हत्येचा वैजापूर येथील समस्त हिंदू नागरिकांच्या वतीने जाहीर आणि तीव्र निषेध करण्यात आला.निकीता ही लवजिहाद ची व  बळजबरीने धर्मांतराची बळी ठरली असून निकिता ला योग्य न्याय मिळावा व निकिता च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी आणि त्याच्या सहआरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच घोषणांच्या माध्यमातून मागणी व्यक्त केली तसेच भविष्यात लव जिहाद रोखण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलून लव जिहाद रोखण्यासाठी विशेष कायदा करण्यात यावा अशी मागणी ही या वेळीं करण्यात आली.यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments