औरंगाबादमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एटीएम फोडता नाही आले म्हणून पळवले मशीनसहइंडिया बँकेच्या एटीएममध्ये गुरुवारी दुपारी भरण्यात आले होते पैसे.


औरंगाबादमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एटीएम फोडता नाही आले म्हणून पळवले मशीनसह
इंडिया बँकेच्या एटीएममध्ये गुरुवारी दुपारी भरण्यात आले होते पैसे

औरंगाबाद : सणासुदीनंतरही लुटमार आणि दरोड्याच्या घटना थांबण्याचे नाव घेईना. आधीच कोरोनाने त्रस्त झालेल्या नागरिकांत आता चोरी आणि दरोडेखोरी यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये चोराट्यांनी धुमकूळ घातला. 

एटीएम लुटण्यासाठी आलेल्यांना ते फोडता आले नाही म्हणून मशीन पळवल्याची धक्कादायक घटना घडली.
औरंगाबाद-पैठण रोडवरील ढोरकीन बाजारपेठेत ही धक्कादायक घटना घडळी. 
एटीएम लुटण्यासाठी आलेल्यांना ते फोडता आले नाही म्हणून मशीन पळवल्याची  घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासणी सुरू केली आहे.  इंडिया बँकेचे हे एटीएम होतं. गुरुवारी दुपारी या एटीएममध्ये पैसे भरण्यात आले होते. 
एटीएम फोडता आले नाही म्हणून अख्खे मशीन पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 
पोलिसांव्यतिरिक्त फॉरेन्सिक, डॉग स्कॉड, सह विविध पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर चोरट्यानी एटीएम उखडून चारचाकी गाडीतून पोबारा केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


Post a comment

0 Comments