मुख्यमंत्री आता स्वतःला अटक करून घेणार का ? चंद्रकांत पाटील.दि. १० मंगळवारी : एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत चंद्रकांत पाटील असे म्हणाले की, गेल्या कित्येक महिन्यांपासून जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर  असलेल्या कर्तव्यनिष्ठ एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन या राज्य सरकारने अजूनही थकवून ठेवले आहे. आधीच आर्थिक परिस्थिती ढासळली असताना वेळेवर वेतन नाही, तर कुटुंबाला पोसायचं कसं? या चिंतेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. यावेळी एका आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याने ठाकरे सरकारचा उल्लेख आपल्या सुसाईड नोटमध्ये करून तेच आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. 

आता जुन्या गोष्टी उकरून काढून पत्रकार अर्णब गोस्वामी तुरुंगात डांबणारे मुख्यमंत्री स्वतःचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आल्यानंतर स्वतःला अटक करवून घेणार आहेत का? याच उत्तर त्यांनीच द्यावं. त्यात आपले परिवहन मंत्री अनिल परब जे या गोष्टींवर कधीही काही बोलत नाहीत, मात्र इतर विषयांवर माथेफोडी करण्यासाठी त्यांना वेळ असतो. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, मात्र आता मुख्यमंत्री कारवाई करणार की नाही? मुळात गोस्वामी यांच्या अटकेमुळे राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकार जनतेनंतर, शेतकऱ्यांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही जीवावर उठले आहे. त्यामुळे त्यांचा हा निष्काळजीपणा आता त्यांनाच भोवणार आहे.

Post a comment

0 Comments