पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले?, शिवसेना आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य.

लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले, पोलीसही हप्ते घेतातच ना, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केले.रत्नागिरी - लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले, पोलीसही हप्ते घेतातच ना, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केले. 
पोलिसांनी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू सावंत यांच्यावर अवैध दारुविक्री केल्यामुळे कारवाई केली असून त्यांची पाठराखण करताना भास्कर जाधव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
यावेळी त्यांनी 'भाजपा नगरसेवकावर कारवाई होत नाही. पण, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई होते?' असा प्रश्नही उपस्थित केला. 
गुहागरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून हा मुद्दा उचलून सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.
यावेळी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, 'पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का?' यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना फक्त दोन गोष्टींसाठी आपल्याला फोन करु नका असेही सांगितले.
'फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका. पहिली म्हणजे मुलींची छेडछाड आणि दुसरी म्हणजे चोरी. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे,' असे ते म्हणाले आहे.

Post a comment

0 Comments