पैठण येथील बस जकात नाका चौकी पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी देण्यात यावे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मागणी.पैठण, दि. ६ शुक्रवार : पैठण ही नाथाची भूमी असून या प्रतिष्ठाण नगरीत अनेक राज्यातून अनेक पर्यटक येत असतात, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला महाराष्ट्रभर काम करत आहे. यामुळे पैठण मध्ये येणारे पत्रकार व तालुक्यातील पदाधिकारी याना कार्यालयाची आवश्यकता आहे. तसेच पैठण बस्थानकाजवळ जकात नाका चौकी हि अजून ही अधिकृत कोणालाही देण्यात आलेले नाही त्यामुळे सदरील जकात नाका चौकी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील पर्यटक, समाजसेवक, राजकीय नेते, यांच्या पत्रकार परिषदेसाठी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे सर्वांची तारांबळ उडते आहे, तसेच तालुक्यातील व महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना बसण्यासाठी व स्थानिक पत्रकारांना वृत्त संकलन करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पैठण बस्थानकाजवळ अनेक वर्षापासून असलेली जकात नाका चौकी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यालयासाठी देण्यात यावी. अशी मागणी नगरविकास मंत्र्यासह जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष बाबा अडसूळ, सचिव हारून शेख, विजय खडसन, माऊली बावणे, शिवाजी गाडे, अविनाश गर्दे आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments