गुपकर आघाडीच्या अजेंड्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे का?- देवेंद्र फडणवीस

मुंबई:- जम्मू-काश्मीरमध्ये गुपकर आघाडी ही राष्ट्रविरोधी आघाडी कार्यरत असून या आघाडीचा आम्ही निषेध करतो. यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे या आघाडीमध्ये काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे घुपकर आघाडीच्या अजेंड्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, "जम्मू-काश्मीर भारतविरोधी शक्ती आहेत, अशा शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांशी हातमिळवणी करुन त्या माध्यमातून पुन्हा कलम ३७० लागू झाली पाहिजे, असा प्रयत्न करत आहेत. गुपकर नावानं तिथं अनेक पक्षांचं एकत्रिकरण झालं आहे. सर्वात अश्चर्याची बाब म्हणजे या गुपकर आघाडीमध्ये काँग्रेसही समाविष्ट आहे. आमचा काँग्रेसला सवाल आहे की त्यांचा अजेंडा तुम्हाला मान्य आहे का?

Post a comment

0 Comments