बळीराजासाठी शाहू महाराजांचं घराणं आक्रमक

कोल्हापूर : कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध व्यथा जाणून घेण्यासाठी कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या जनक घराण्याने जनपंचायत अभियान सुरु केलं आहे. या अभियानांतर्गत भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे  शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐकणार आहेत. 

सात आठवडे चालणाऱ्या या अभियानाची सुरुवात आज (६) करवीर तालुक्यातील चिंचवाड इथून झाली. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी, वाढीव वीज बिल, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अशा अनेक व्यथा मांडल्या. 

Post a comment

0 Comments