लॉकडाऊनच्या भीतीने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण.

लॉकडाऊनच्या भीतीने ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण.

कोरोना महामारी मुळे गत सहा महिने नागरिक कामधंदा व्यवसाय नौकर्‍या सोडून त्रस्त होते. आता-आता कोठे सर्व रुळावर येत असताना पुन्हा कोरोना लॉकडाऊनचा चर्चा व आफवा सर्वत्र सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले असुण चिंतीत झाल्याचे चित्र आहे.

बाजार सावंगी : कोरोना महामारी मुळे गत सहा महिने नागरिक कामधंदा व्यवसाय नौकर्‍या सोडून त्रस्त होते आता-आता कोठे सर्व रुळावर येत असताना पुन्हा कोरोना लॉकडाऊनचा चर्चा व आफवा सर्वत्र सुरु झाल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले असुण चिंतीत झाल्याचे चित्र आहे.

यावर्षी मार्च पासून कोरोना महामारी तथा लॉकडाऊन आणि अनलॉकची प्रक्रिया सुरू असल्यामुळे सर्व कामधंदे व्यवसाय नौकर्‍या सोडून नागरिक बंदिस्त होते. गत महिना दोन महिन्या पासून लॉकडाऊन प्रक्रिया उठवून कामधंदे व्यवसाय नौकर्‍या आता - आता रुळावर येत असताना पुन्हा कोरोना तथा लॉकडाऊनच्या आफवा चर्चा रंगु लागली असल्याने ग्रामीण भागात नागरिक शेतकरी अतिशय घाबरले आहे. सध्या खरिप पिक हंगामचे माल शेतकर्‍यांच्या घरात येत असून त्याची विक्री ही शेतकर्‍यांकडून सुरु आहे. यात कोरोना महामारी तथा लॉकडाऊन च्या चर्चेने नागरिकांचे मन बसु लागले असुण ते दुखी झाले आहे. 

कोरोना महामारी मुळे अनेक नागरिकांच्या नौकर्‍या व्यवसाय कामधंदे भुईसपाट झाले आहे. व आता आता त्यानी तडजोड करुन कामधंदे व्यवसाय नौकर्‍या सुर केल्या व मंदिर, मस्जीद, चर्च, गुरूद्वार शाळा उघडल्या, लग्न कार्य उत्साह सुरु झाले असताना पुन्हा कोरोना महामारी तथा लॉकडाऊन च्या चर्चेने व आफवेने नागरिक हैराण झाले आहे. काय करा, कसे करा, कसे होईल, याची भिती नागरिकांच्या मनात घर करुन आहे. लॉकडाऊन नकोच परंतु दक्षता बाळगु असै नागरिकाचे म्हणणे आहे. हे विशेष.

Post a comment

0 Comments