नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणा-यास नाशिक मधुन अटक.

औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणा-यास पुंडलिकनगर पोलिसांनी नाशिक येथून गजाआड केले. केतन उर्फ बाळा रोहिदास गावंडे (वय २४, रा.शिवशक्ती कॉलनी, नाशिक) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे . 
न्यायालयाने त्यास तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सोमवारी (दि.९) दिली. पुंडलिकनगर पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी मुवुंâदवाडी रेल्वेस्टेशन परिसरातून नशेच्या गोळ्या विक्री करणा-या आवेज खान जावेद खान (वय २०, रा.बायजीपुरा) याला अटक करून त्याच्या जवळून १ लाख ७५ हजार रूपये विंâमतीच्या नशेच्या गोळ्या जप्त केल्या होत्या.  त्यावेळी आवेज खान याने नशेच्या गोळ्या नाशिक येथील केतन उर्फ बाळा गावंडे याच्याकडून घेतल्या असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. 
पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार जालिंदर मांन्टे, प्रविण मुळे आदींच्या पथकाने नाशिक येथून केतन उर्फ बाळा गावंडे याला अटक करून शहरात आणले. 
केतन उर्फ बाळा गावंडे याच्याकडून नशेच्या गोळ्या विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.

Post a comment

0 Comments