लपून-छपून उसाच्या शेतावर हत्तीचं पिल्लू मारत होतं ताव.

मुंबई : हत्तीच्या पिल्लाचे मजा मस्ती करताना तर कधी खट्याळपणे हसवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अशा प्रकारचा आणखीन एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आपण पाहिलं तर हत्तीचं पिल्लू शेतातील उसावर ताव मारत आहे. तेवढ्यात मागून एक व्यक्ती त्याच्या अंगावर प्रकाश पाडतो. आपण पकडले गेलो या भीतीनं हत्ती लपण्यासाठी जागा शोधतो.
हत्तीच्या पिल्लाला काहीच सुचत नाही अखेर तो एका खांबाच्या आड लपायला जातो. आपण या खांबामागे लपले जाऊ असा भाबडा विश्वास या पिल्लाला असतो. या हत्तीच्या पिल्लाचे गमतीशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. उसाच्या शेतावर ताव मारत असताना आपण पकडले गेलो आणि लपण्यासाठी खांबाचा आधार घेतल्यानं सोशल मीडियावर या फोटोवर युझर्सनी भन्नाट कमेंट्स देखील केल्या आहेत.

Post a comment

0 Comments