सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात, ईडी कार्यालयात नेण्याची शक्यता.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयांवर ईडीची छापेमारी.


मुंबई : शिवसेना आमदार  प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. 
प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केले. 
सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक  यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. 
मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. 
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचे भाजपने समर्थन केले आहे.

Post a comment

0 Comments