शरद पवार जेव्हा येतात, तेव्हा मी काय पाटी- पेन्सील घेऊन अभ्यासाला बसत नाही- उद्धव ठाकरे

मुंबई: महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची एकदम वेगळी भूमिका राष्ट्रवादी पक्ष अजिबात घेणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपने आता स्वत:च्या जीवावर सत्तेत येण्याची स्वप्ने बघावी. पण तीही त्यांना शक्य होणार नाहीत, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगावला. आम्हाला हरवता येत नाही ना मग, बदनाम करा. या वृत्तीने भाजप वागत आहे. याच पंचवीस वर्षाच्या सहकाऱ्याने आमचा विश्वासघात केला, हे एकमेव आणि कधीही न विसरता येणारे शल्य आहे. भाजपा आता उपऱ्यांचा पक्ष झाला आहे. 
मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सल्ल्याने वागतात आणि निर्णय घेतात, असा आरोप सतत विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपवरुनही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. शरद पवार आणि आमच्या परिवाराचे संबंध शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असल्यापासून आहेत. राजकीय संबंध देखील आहेत. शरद पवार जेव्हा येतात तेव्हा मी काही पाटी- पेन्सील घेऊन अभ्यासाला बसल्यासारखा बसत नाही. ते अनुभवाचे बोल सांगतात. त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या घटनांमध्ये त्यांनी काय केले होते हे सांगतात. या परिस्थितीत काय केले पाहिजे हे सांगतात. त्यामुळे त्याचा फायदाच होतो, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

Post a comment

0 Comments