मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. ईडीच्या या कारवाईविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत घटकपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आमची चौकशी खुशाल करा, जे असेल ते बाहेर येईल असे म्हणत, राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे चांगले उद्योजक आहेत. त्यांनी जर काही केलं नसेल, तर त्यांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी शासकीय यंत्रणांना तपास करु द्यावा, असे आठवले म्हणाले. तसेच, या यंत्रणा कोणाच्याही विरोधात नाहीत. राज्यातील सरकार पाडण्यासाठी आम्हा या यंत्रणांचा वापर करत नाहीयेत. संजय राऊत म्हणतात आमच्याही चौकशा करु, त्यांनी जरुर चौकशी करावी. जे सत्य असेल ते बाहेर येईल, असे आठवले म्हणाले.
0 Comments