वीजबिल भरू नका, राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन.

वीजबिल भरू नका, राज ठाकरेंचे नागरिकांना आवाहन.
राज्यभरात वाढीव वीज बिलाविरोधात मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मुंबई - आज राज्यभरात वाढीव वीज बिलाविरोधात मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये शेकडो कार्यकर्ते वीज बिल माफ करण्याची मागणीसाठी अंदोलने करत आहेत. 
ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले जात आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला वीज बिल भरु नका असे आवाहन केले आहे. मनसे नेत्यांनी एका न्यूज चॅनलला याबाबत माहिती दिली आहे.

काय आहे राज ठाकरे यांच्या निवेदनात...
'या सरकारने वीज देयकातून जिझिया कर लावला आणि जनतेची लूट सुरु केली. हे सरकार जनतेलाच वाढीव वीज आकारणीचा शॉक देणार असेल तर मग आम्हाला जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. आम्ही महाराष्ट्रातील जनतेला काही झाले तरी वाढीव वीज देयके भरु नका असे आवाहन केले आहे. 
असा असहकार पुकारल्याशिवाय सरकारला जनतेतील असंतोष जाणवणार नाही. 
सरकारच्या तुमच्या वीजेची जोडणी तोडू शकत नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर संघर्ष माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी आहे हे लक्षात ठेवा', असा इशारा राज ठाकरे यांनी निवेदनातून दिला आहे.

Post a comment

0 Comments