दोन महिन्यांपासून गोदावरीत विसर्ग सुरूच, सहा दरवाज्यातून ३ हजार १४४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू.
पैठण, दि.६ शुक्रवार: जायकवाडी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिन्यापासून गोदावरीत विसर्ग सुरू असल्याची माहिती जायकवाडी पाठबंधारे  विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली. नाशिक, नांदूर मधमेश्वर या धरणावर अवलंबून न राहता प्रथम जायकवाडी धरणाच्या जलफुगवठा भागात प्रचंड अतिवृष्टी झाल्याने
 गोदावरी नदी पात्रात मोठा विसर्ग सुरू आहे. तसेच ऊर्ध्व भागातील सर्व धरणे १०० % भरले आहे. जायकवाडी धरणातुन गोदावरी नदी पात्रात आज पर्यत ८१ टी एम सी पाणी सोडण्यात आले आहे.
मराठवाड्याची संजीवनी असलेल्या 
नाथसागर धरण १००% टक्के भरले असून गेल्या ६२ दिवसापासून ८१ टीएमसी पाणी गोदावरी नदी पात्रात सोडले आहे. सध्याची पाणी पातळी १५२२ फूट, ४६३ .९०६ मीटर आहे .
धरणाच्या सहा दरवाज्यातून ३ हजार १४४ क्युसेक वेगाने अजूनही गोदावरीत विसर्ग सुरू आहे . तर आज रोजी जायकवाडी धरणात ३ हजार १४४
क्युसेक वेगाने आवक सुरू असल्याची माहिती अभियांत्रिकी सहाय्यक राजाराम गायकवाड यांनी मराठा तेजच्या प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली.
जायकवाडी धरणावर कर्मचाऱ्यांची संख्या कमी नसताना आपत्कालीन काळात कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय उपअभियंता ज्ञानदेव शिरसाठ, सहाय्यक अभियंता संदीप राठोड, कनिष्ठ अभियंता बी, वाय, अंधारे, स्थापत्य अभियांत्रिकी  गणेश खराडकर, बबन बोधने, रमेश चक्रे, ऑफेरेटर रामनाथ तांबे, शेषराव आडसूळ परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

धरणात पाणी साठवण सुरू झाल्याच्या ४५ वर्षांत प्रथमच या धरणाचे दरवाजे उघडून विक्रमी ६२ दिवस गोदावरी नदी पात्रात पाणी विसर्ग सुरूच असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी 
जायकवाडी धरणाचे दरवाजे ५ सप्टेंबर रोजी उघडण्यात आले . दोन टप्प्यात  जायकवाडी धरणातून ६२ टी एम सी पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले. जायकवाडी धरणाच्या खालील सर्व निम्न बंधारे ओहरफ्लो झाले आहे. सर्व पाणी आंध्रप्रदेशात जात आहे.  जायकवाडी धणाच्या जलफुगवठा भागात या वर्षी विक्रमी पाऊस झाला. इतिहासात पहिल्यांदाच दोन टप्प्यात सलग ६२ दिवस जायकवाडी धरणात विसर्ग सुरू आहे.
         

Post a comment

0 Comments