औरंगाबाद विभाग पदवीधर निवडणुकीसाठी पाच नामनिर्देशनपत्र दाखल.औरंगाबाद, दि.10 मंगळवारी  :- 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक- 2020 करिता दि. 9 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले. 
नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांचे नाव :  घाडगे राणी रवींद्र (अपक्ष),  बीड.  घाडगे यांनी चार अर्ज दाखल केले. तर ॲड. शरद बहिणाजी कांबळे (अपक्ष), बीड.,  ॲड. शहादेव जानु भंडारे (अपक्ष) मु.पो.दासखेड, ता.पाटोदा, जि.बीड.  ॲड.गणेश नवनाथ करांडे (अपक्ष), बीड आणि अंकुशराव शिवाजीराव पाटील (पक्ष- राष्ट्रीय मराठा पार्टी), मु.पो.होणाळी, ता.देवनी, जि.लातूर यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविली आहे.  


Post a comment

0 Comments