प्रेयसीला बोलण्याच्या कारणावरून तरुणाचा खून, बारा तासांत खूनाचा छडा; तिघांना अटक.


मारेकऱ्यांनी डोक्यावर शस्त्राने केले घाव, नंतर तुरीच्या शेतात फेकला मृतदेह.

हिंगोली : वसमत तालुक्यातील गुंडा येथील तरुणाच्या खुनाला वाचा फुटली असून अवघ्या बारा तासांत हट्टा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. 

प्रेयसीला बोलण्याच्या कारणावरून त्यांनी ज्ञानेश्‍वर चव्हाण या तरुणाचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी मंगळवारी (ता. २४) रोजी हट्टा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

वसमतमधील गुंडा येथील समत तालुक्यातील गुंडा येथील तरुणाच्या खुनाला वाचा फुटली असून अवघ्या बारा तासांत हट्टा पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. 

ज्ञानेश्‍वर शिवाजी चव्हाण (२१) हा शनिवारी ता. २१ पासून बेपत्ता होता. या प्रकरणात हट्टा पोलिस ठाण्यात नोंदही झाली होती. मारेकऱ्यांनी डोक्यावर शस्त्राने घाव करून तुरीच्या शेतात मृतदेह फेकला. त्यानंतर सोमवारी (ता. २३) त्याचा मृतदेह कळंबा पाटी जवळील एका तुरीच्या शेतात आढळला होता. 

त्याच्या डोक्यावर शस्त्राने वार केल्याचे दिसल्याने, त्याचा खून झाल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्ययक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. 

दरम्यान, मयत ज्ञानेश्‍वर याचा खूनच असल्याचा निष्कर्ष काढून पोलिसांनी मोबाईल लोकेशन व मिळालेल्या माहितीवरून प्रमोद अप्पासाहेब खाडे, विनोद भीमराव कापुरे (दोघे रा. हट्टा), प्रवीण लक्ष्मण अंभोरे (रा.परभणी) या तिघांना ताब्यात घेतले. सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, व उपनिरक्षक घेवारे यांनी त्या तिघांची कसून चौकशी केली. त्यांची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर खूनाचा उलगडा झाला. 

प्रमोद खाडे याच्या प्रेयसीसोबत ज्ञानेश्‍वर हा बोलत होता. त्यामुळे त्याचा राग मनात धरून ज्ञानेश्‍वर यास संपविण्याचा निर्णय घेतला. अन् शनिवारी (ता.२१) संधी मिळाल्यानंतर त्याची दुचाकी अडवून त्याच्या डोक्यात लोखंडी अँगल घालून त्याचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. तर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्यांची दुचाकी जिंतूर रोडवर हिवरखेडा शिवारात पुलाखाली पाण्यात टाकून दिल्याची कबुली दिली आहे. 

या प्रकरणी वरील तिघांवर मंगळवारी (ता.२४) पहाटे हट्टा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे पुढील तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments