संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गाळपास ४ नोव्हेंबरला होणार सुरवात.


पैठण - पैठण तालुक्याची अस्मिता असलेल्या श्री   संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचा सन  २०२०-२१ चा गाळप हंगाम सचिन घायाळ शुगर पैठण तर्फे   दिनांक  ४ नोव्हेंबर  २०२० , बुधवार  पासून  अंबाऋषी संस्थानचे गादिपती महंत श्री. कृष्णगिरी  महाराज यांच्या शुभहस्ते सकाळी ११ वाजता उसाची मोळी टाकून होणार आहे. 

तत्पूर्वी सकाळी  ९ वाजता कारखान्यामध्ये बांधण्यात आलेल्या नवीन बॉयलरची विधिवत अग्नी प्रतिपदन संपत्नीक पूजा सभासद प्रतिनिधी श्री दत्तात्रय राधाकिसन गोर्डे, संचालक श्री विक्रमराव (काका) घायाळ, संचालक श्री रमेश पाटील क्षीरसागर, ऊस उत्पादक प्रतिनिधी  श्री रामजी (नाना ) पा. मोरे, ऊस तोडणी ठेकेदार प्रतिनिधी  श्री बापूराव आढाव, कामगार प्रतिनिधी श्री सुखदेव भालेकर  यांच्या शुभ हस्ते होणार आहे  . हंगाम २०२०-२१ ला कारखान्याची गाळप क्षमता  १२५० टन वरून  २५०० टन  करण्यात आलेली आहे . जुने बॉयलर पाडून आधुनिक पध्दतीचे जास्त क्षमतेचे बॉयलर टाकण्यात आले आहे. तसेच रोटरी स्क्रीन, डायनो ड्राइव्ह, नवीन बॉडी, सेंट्रिफ्युगल मशीन, कंडेन्सेट पंप, नवीन रोलर, नवीन पाईपलाईन  व इतर असंख्य आधुनिकीकरणाची कामे करण्यात आलेली आहे, त्यामुळे यावर्षी ३,००,००० टनापेक्षा जास्त  गाळप होईल असा विश्वास, सीए.श्री  सचिन भैया घायाळ यांनी व्यक्त केला आहे. 
या वर्षी पैठण तालुक्यामध्ये उसाचे विक्रमी उत्पादन झालेले आहे, बाहेरच्या कारखान्यांची यंत्रणा पैठण तालुक्याच्या प्रमाणा पेक्षा कमी आहे, वाऱ्यामुळे ऊस  पडलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ऊस जावा अशी शेतकर्यांची इच्छा आहे. संत एकनाथ मुळे ग्रामिण भागातील सर्व शेतकर्यांच्या उसाची चिंता मिटणार आहे. कारखान्यातर्फे यावर्षी ऊस तोडणीसाठी ५०० टायर गाडी, १५० जुगाड  व ७० वाहन टोळी  अशी अॅडव्हान्स दिलेली यंत्रणा भरण्यात आलेली आहे अशी माहिती मुख्य शेतकी अधिकारी श्री सुदर्शन खेडकर यांनी दिली .  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साधेपणाने करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे . तरी तालुक्यातील सभासदांनी व शेतकर्यांनी आवर्जून कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन श्री तुषार शिसोदे यांनी केले आहे  .

Post a comment

0 Comments