कोरोना योद्धा म्हणून नगरसेवक भाग्येश गंगवाल यांचा गौरव.


गंगापुर :- ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्यामार्फत कोरोना महामारी काळात करत असलेल्या समाजोपयोगी कार्याबद्दल कोरोना योद्धा म्हणून नगरसेवक भाग्येश गंगवाल यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 
हे सन्मान पत्र गंगापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे व नगराध्यक्ष प्रदिप भैय्या पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
नगरसेवक भाग्येश गंगवाल यांनी लॉकडाऊनच्या काळात रक्तदान शिबीर, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी फेस शिल्ड मास्क व सॅनिटायझरचे वाटप,लॉकडाऊनच्या काळामध्ये आपला वाढदिवस साजरा न करता उपजिल्हा रुग्णालय गंगापुर येथे ५१ हजार रुपयाच्या विविध वस्तु भेट दिल्या त्यामध्ये सोलापुरी चादर,शाल,इनव्हटर बॅटरी इत्यादी साहित्य दिले,हातावर पोट भरत असलेल्या अनेक गरजू लोकांना रोज शेकडो लोकांना दररोजचे जेवण पुरविले.
नगरपरिषद हद्दीतील दररोजच्या जीवनात लागणारे किराणा सामान १००० पेक्षा जास्त लोकांना नगरसेवक भाग्येश गंगवाल यांनी वाटप केले. या अविरत सेवेबद्दल नगरसेवक भाग्येश गंगवाल यांना पोलिस स्टेशन गंगापुर क्षेत्रातील एकमेव कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्यामार्फत कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नगरसेवक व समाजसेवक या नात्याने ग्रामीण पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांचे आभार मानत असून असेच समाजोपयोगी कार्य करत राहू असे आश्वस्त नगरसेवक भाग्येश गंगवाल यानी केले आहे.

Post a comment

0 Comments