मिठागरात मिठाचा खडा टाकू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : “कांजूरमार्गची जमीन मिठागराची आहे म्हणणाऱ्यांनी मिठागरात मिठाचा खडा टाकू नका,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडवरुन लगावला. “मुंबईकरांच्या हितासाठी कोणत्याही टीकेची पर्वा न करता काम करणार,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून मुंबई मेट्रोच्या कारशेडवरुन राजकारण सुरु आहे. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.
मेट्रोसाठी जर्मनीच्या के. एफ. डब्ल्यू या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरो एवढ्या रकमेचं कर्ज अत्यंत माफक दरात घेतलं आहे. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. यावेळी त्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात खूप सोईचे वाटते. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सोबत आहेत. असे म्हटलं होतं” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Post a comment

0 Comments