‘एम.फिल‘च्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी १ हजार १७४ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन ‘सीईटी‘साठी नोंदणी.

‘एम.फिल‘ची गुणवत्ता यादी घोषित, २३० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू.


औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘एम.फिल‘ अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व परीक्षा सीईटी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. 
२४ तासांच्या आत या परीक्षाचा निकालही जाहीर करण्यात आला असून सोमवारी (दि.२३) प्रवेशित विद्याथ्र्यांची गुणवत्ता यादी घोषित करण्यात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ‘एम.फिल‘च्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी १ हजार १७४ विद्याथ्र्यांनी ऑनलाईन ‘सीईटी‘साठी नोंदणी केली. विद्यापीठातील १८ विभागांत एम.फिल अभ्यासक्रम चालविला जात आहे. 

यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्रृ लोकप्रशासन, गणित, कॉर्मस, पाली अ‍ॅण्ड बुध्दिझम, ऊर्दु, ग्रंथालय व माहितीशास्त्र, संगणकशास्त्र, शारीरिक शिक्षण, शिक्षणशास्त्र, जर्नालिझम, एमबीए आदी विभागांचा समावेश आहे. एम.फिल ‘सीईटी‘साठी १ ते १० नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. 

एकुण १ हजार १७४ जणांनी नोंदणी केली. यामध्ये राज्यशास्त्र विभागातील सर्वाधिक १५४ जणांनी तर वाणिज्यशास्त्र विभागात ११५ जणांनी नोंदणी केली. 
२१ नोव्हेंबर रोजी लगेच निकाल घोषित करण्यात आला. दरम्यान, मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली एम.फिल प्रक्रियेदर्भात शनिवारी बैठक घेण्यात आली. 

यावेळी प्र.कुलगुरू डॉ.शाम शिरसाठ, प्रवेश समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेश गायकवाड, परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा आदींची उपस्थिती होती. पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके, प्रमोद गुलगुले, अभिषेक कदम आदींनी ही प्रक्रिया यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले.

संशोधन प्रक्रियेला चालना देणार : मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने संशोधक विद्याथ्र्यांना चालना देण्यासाठी एम.फिल प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर ‘पेट‘ प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. 

विद्यापीठाच्या वतीने पदवी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या सोबतच एम.फिल सीईटीही यशस्वीपणे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली, ही समाधानाची बाब आहे, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले म्हणाले. 
नवीन शैक्षणिक धोरणात एम.फिल अभ्यासक्रम बंद करण्यात आला आहे. 

तथापि हे धोरण सन २०२२ पासून लागु करण्यात येणार आहे. त्यामुळे संशोधक विद्याथ्र्यांनी मागणी तसेच बार्टी, सारथी, महाज्योती, युजीसी आदी संस्थांची फेलोशिप मोठया प्रमाणावर विद्यार्थ्यांना प्राप्त होते, या सर्व बाबींचा विचार करुन ‘एम.फिल‘ अभ्यासक्रम सुरुच ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.

 ‘एम.फिल‘च्या २३० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु.

पदव्यूत्तर विभागापैकी १८ विभागांत जवळपास २३० जागांसाठी प्रवेशपरीक्षा घेण्यात आली. 
शुक्रवारी सकाळी ११ ते २ दरम्यान ऑनलाईन पध्दतीने परीक्षा दिली. एकुण ११०८ विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. यामध्ये राज्यशास्त्र विभागाचे सर्वाधिक १५१ विद्यार्थी असून वाणिज्यशास्त्र १०८ तर इंग्रजीत १०७ सीईटी दिली. विद्यापीठ कार्यक्षेत्रासह राज्यातील तसेच परराज्यातील विद्यार्थीदेखील ऑनलाईन ‘सीईटी‘ यशस्वीपणे देऊ शकले. या विद्याथ्र्यांची प्रवेशप्रक्रिया २१ ते ३० नोव्हेंबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. प्रवेशित विद्याथ्र्यांची गुणवत्ता यादी सोमवारी (दि.२३) घोषित करण्यात आली.
१ डिसेंबरपासून प्रत्यक्ष तासिकांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती पदव्यूत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ.दिगंबर नेटके यांनी दिली.Post a comment

0 Comments