राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचापोलिस उपायुक्तांनी घेतला आढावा.औरंगाबाद, दि. ७ शनिवार  : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करावयाच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा पोलिस उपायुक्त मीना मकवाना यांनी आज घेतला. तसेच राष्ट्रीय तंबाखू  नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू नियंत्रण कायदा २००३ कलम ५, सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादन कायदा २००३, गुटखा बंदी, अनधिकृत हुक्का पार्लर आदीबाबत यंत्रणांनी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या.

पोलिस आयुक्तालयात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आढावा बैठक श्रीमती मकवाना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, सहायक पोलिस अधीक्षक भांबरे, सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे, सहायक पोलिस निरीक्षक एच.बी. बोराडे, पोलिस उपनिरीक्षक नरसिंग पोमनाळकर, अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस. अजिंठेकर आदींची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक श्री. कुलकर्णी यांनी केले. आभार डॉ. काकड यांनी मानले.

Post a comment

0 Comments