दिवाळीसाठी सुरू केलेल्या विशेष रेल्वे होणार बंदरेल्वेकडून व्यवसाय कमी असल्याचे कारण पुढे.

पूर्णा : आरक्षणास रेल्वे प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळत असुन व्यवसाय कमी होत असल्याचे गोंडस कारण पुढे करीत दक्षिण मध्य रेल्वेने मोठा गाजावाजा करीत सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या विशेष रेल्वे ऐन दिवाळी सणातच रद्द करण्याचा निर्णय जाहीर करत मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे.
दरम्यान, पाच विशेष रेल्वे रद्द करणार असल्याचे आदेश दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी बुधवारी (दि.11) काढले आहेत. परभणी येथून सेलू, जालना, नांदेड, गंगाखेडला जाणार्या प्रवाशांनी रेल्वेऐवजी आपापल्या वाहनाव्दारे किंवा एसटी बसने प्रवास करणे पसंद केल्याचेही मागील काही दिवसांतून दिसून आले. आरक्षणासह चुकीच्या वेळांच्या कारणामुळेच प्रवाशांनी रेल्वेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
 रेल्वे विभागाने आपली हटवादी भूमिका सुरवातीपासूनच कायम ठेवल्याने शिवाय, रेल्वे संघटनांच्या इशार्यानंतर मराठवाड्यातील प्रवाशांसाठी रेल्वे सुरू केल्या.
दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड - पनवेल - नांदेड, धर्माबाद नांदेड धर्माबाद, काचिगुडा नरखेड काचिगुडा, काचिगुडा अकोला काचिगुडा या रेल्वे 23 ते 28 ऑक्टोबरच्या दरम्यान मोठा गाजावाजा करित सुरू केल्या. या सर्व रेल्वेतून प्रवास करण्यासाठी आरक्षण गरजेचेच असल्याची अट घातली. 
मात्र, सर्व रेल्वे जाहिर केलेल्या तारखेच्या आधीच बंदकरण्याचा घाट रेल्वेप्रशासनाने सुरू केला असून त्यावर अंमलबजावणीही करण्यात येत आहे. 
नांदेड पनवेल नांदेड (क्र.07614 व 13) ही 23 व 24 ऑक्टोबरला सुरू केली होती. ती 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे म्हटले होते. मात्र, ही रेल्वे नांदेड येथून 23 व पनवेल येथून 24 नोव्हेंबरपासून रद्द (बंद) करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. धर्माबाद मनमाड धर्माबाद (क्र. 07688 व 87) ही रेल्वे 24 ऑक्टोबर रोजी सुरू केली होती. 
ती पण 30 नोव्हेंबरपर्यंत धावेल असे म्हटले होते मात्र, 15 नोव्हेंबर (रविवारी) ऐन दिवाळीमध्येच रद्द (बंद) करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिवाळी सण समोर ठेवून सुरू केलेली ही दिवाळीच्या दिवशीच रद्द (बंद) करीत रेल्वे विभागाने प्रवाशांना जणू काही दिवाळी गिफ्टच देत असल्याचा अविर्भाव चालवला असल्याचे त्यांच्या या तुघलकी कारभारावरून दिसून येते. याचबरोबर तिरूपती - कोल्हापूर तिरूपती (क्र. 07415 व 16) ही रेल्वे 28 व 30 ऑक्टोबरपासून सुरू केल्या होत्या. मात्र, तिरूपतीहून गुरुवार (दि.12) रोजी तर कोल्हापूर येथून धावणारी 14 नोव्हेंबर रोजी शेवटचा प्रवास करेल असे म्हटले आहे.
या शिवाय काचिगुडा नरखेड काचिगुडा (क्र.07641 व 42) विशे रेल्वे 23 व 24 ऑक्टोबरला सुरू केली होती. ती 29 व 30 नोव्हेंबरपर्यंत धावणार होती. मात्र, ही विशेष रेल्वे काचिगुडा येथून 14 नोव्हेंबरला तर नरखेड येथून 15 नोव्हेंबरला शेवटचा प्रवास करणार आहे. काचिगुडा अकोला काचिगुडा (क्र.07639 व 40) ही रेल्वे 26 व 27 ऑक्टोबरला सुरू केली होती. ती 23 व 24 नोव्हेंबरपर्यंत असेल असे जाहीर केले होते. मात्र, ही विशेष रेल्वेही 16 नोव्हेंबरला काचिगुडा येथून तर अकोला येथून 17 नोव्हेंबरला शेवटचा प्रवास करेल, असे दक्षिण मध्य रेल्वेने बुधवारी जाहीर केले आहे.

मुंबई-किनवट विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबादपर्यंत : प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई-किनवट -मुंबई विशेष रेल्वे दि. 12ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार आदिलाबाद पर्यंत करण्यात आला आहे. हि रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. 
 अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणारनसल्याचे सांगण्यात आले आहे. ही गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा , हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्रकुंड, बोधडी बुज्रुग, किनवट येथे थांबणार आहे. या गाडीस एकूण 18 डब्बे असतील. या गाडीत वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असणार आहे.


Post a comment

0 Comments