वैजापूर साठी अर्थसंकल्पात २८ कोटी ची तरतूद-आमदार रमेश बोरणारे.


वैजापूर, दि, ५ गुरुवार : वैजापूर तालुक्यासाठी २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात २८ कोटी ३९ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार असुन नारंगी धरणात पालखेडचे पाणी आणण्यासाठी वितरिका (४२ कोटी रुपये),  तालुका क्रिडांगणासाठी पाच कोटी, रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी पाच कोटी व तहसिल कार्यालयाच्या नुतन इमारतीसाठी सात कोटी रुपयांचे प्रस्ताव शासनस्तरावर आहेत. अशी माहिती आमदार रमेश बोरनारे यांनी बुधवारी (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी वैजापुरचे उपनगराध्यक्ष साबेरखान, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती अविनाश गलांडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ यांची उपस्थिती होती. बोरनारे म्हणाले, २४ नोव्हेंबरला आमदार म्हणुन निवडुन येण्यास एक वर्ष पुर्ण झाले. या एक वर्षात मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन काम करत असुन तालुक्यातील दहा जिल्हा परिषद गटात समान निधी देऊन विकास कामे करण्याचे धोरण अवलंबले आहे. पहिल्या टप्प्यात ५० लाख रुपयांचा निधी मिळाल्यानंतर आठ गावात त्यापेक्षा जास्त म्हणजे ६३ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकिय मान्यता (प्रमा) मिळाली. चालु वर्षात एक कोटीच्या आमदार निधीतुन तब्बल एक कोटी ४३ लाख रुपये खर्चाच्या कामांना मान्यता मिळवली आहे. वैजापूर तालुक्यातील सहा व गंगापूर तालूक्यातील एक अशा सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका देणार असुन यातील दोन आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका दिल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यापासुन आतापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता न बघितलेल्या पानगव्हाण व खिर्डी या गावांसाठी निधी देण्यात आला आहे. विकास कामांच्या नियोजनाबाबत ते म्हणाले, ग्रामीण भागात दहा टप्प्यात विकास करणार असुन शहराच्या विकासासाठीही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. यात मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधण्यात येणार असुन त्यासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. ग्रामीण विकास खात्यातर्फे मिळालेल्या चाळीस कोटी रुपयांच्या निधीतुन दहा सर्कलमध्ये प्रत्येकी चाळीस लाख रुपये खर्चाची विकास कामे करण्यात येणार आहेत.  यात विरगाव व डोणगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाचाही समावेश करण्यात आला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत तालुक्यातील पुरणगाव ते डोणगाव व शिऊर ते जिरी या रस्त्यांसाठी दोन कोटी वीस लाख रुपये मंजुर झाले आहेत.अर्थसंकल्पातुन तलवाडा येथे पुलासाठी एक कोटी २५ लाख रुपये, करंजगाव ते मनुर धोंदलगाव रस्त्यावर पुलासाठी दिड कोटी रुपये, लासुर शहाजतपूर पालखेड येथील पुलासाठी दोन कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. याशिवाय वैजापूर ते उक्कडगाव रस्त्याच्या.डांबरीकरणासाठी पाच कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील परसोडा ते बेंदवाडी, खंडाळा ते भायगाव, गारज शिवगाव बाभुळगाव नालेगाव व गंगापूर तालुक्यातील मांजरी फाटा, मुद्देश वाडगाव व वाहेगाव या रस्त्यांची कामे प्रस्तावित केल्याचे त्यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments