सिंधुदुर्गाच्या वाट्याचे मंत्रिपद गेले, दीपक केसरकरांच्या नाराजीवर विनायक राऊत यांचं प्रत्युत्तर

सिंधुदुर्ग: मला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, पण सिंधुदुर्गाच्या वाटचे मंत्रिपद गेले, अशी खंत बोलून दाखवणारे शिवसेना नेते दीपक केसरकर यांना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार उदय सामंत यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे, ते पालकमंत्रीही आहेत. उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपूत्र आहेत, असा प्रतिवाद विनायक राऊत यांनी केला. 

काही दिवसांपूर्वीच दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील पत्रकारपरिषदेत आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखविली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नसल्यामुळे आपण नाराज आहोत. मला नाही निदान वैभव नाईक यांना तरी मंत्रिपद मिळायला पाहिजे होते, असे वक्तव्य करुन केसरकर यांनी अप्रत्यक्षपणे विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला होता.  दीपक केसरकर यांचा आरोप खोडून काढला. उदय सामंत यांच्या रुपाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळाले आहे. उदय सामंत वेंगुर्ल्याचे असल्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच आहे. मात्र, दीपक केसरकर यांची नेमकी काय भूमिका आहे, ते माहीत नाही. 

Post a comment

0 Comments