हवामान विभागाने दिला किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

तामिळनाडू-पद्दुचेरी किनार पट्टीवर 'निवार' चक्रिवादळ धडकणार.
हवामान विभागाने दिला किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

नवी दिल्ली - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्यात चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे वादळ २५ नोव्हेंबरला तामिळनाडू, पद्दुचेरीच्या किनार पट्टीवर धडकणार आहे. या चक्रीवादळाचे नाव 'निवार' असे ठेवले आहे. 

हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या वाऱ्याचा वेग १०० ते १२० किलोमिटर प्रतितास इतका आहे.

बुधवारी हे चक्रीवादळ तामिळनाडूच्या कराईकाल आणि महाबलीपूरम दरम्यानच्या किनाऱ्यावर आदळणार आहे. त्यापूर्वीच किनाऱ्यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'बुधवारी तामिळनाडू, पद्दुचेरी आणि कराईकल या भागात अनेक ठिकाणी पाऊस पाडण्याची शक्यता आहे.. काही ठिकाणी हा पाऊस अत्यंत मुसळधार कोसळू शकते.'

बंगालच्या उपसागरात दक्षिण-पश्चिम भागांत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिम-उत्तर भागांच्या दिशेने गेला आणि त्यांचे रुपांतर 'निवार' चक्रिवादळात झाले. हे चक्रिवादळ पद्दुचेरीपासून ४१० किलोमीटर दूर आहे. पुढील २४ तासांत या चक्रिवादळाचे रुद्रावतार पाहायळा मिळणार आहे. 

पुढील १२ तासांत हे वादळ पश्चिम-उत्तरेच्या दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे. निवास चक्रिवादळाच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात बचाव दलाचे १२०० जवान तैनात केले आहेत.

Post a comment

0 Comments