अन्यथा... आम्ही टॕक्स (कर) भरायचं बंद करणार..संभाजी ब्रिगेडपुणे - शहरात कुठल्याही भिंतीवर पहा किंवा चौकातील उड्डाणपुलावर कुठलीही 'स्लोगन,' पुतळा असली की तिथं नगरसेवकाचे नाव छापले जाते... हा गलिच्छ प्रकार थांबला पाहिजे. नगरसेवक हे विकासपुरुष नाहीत.  'स्वच्छ पुणे... सुंदर पुणे' म्हणायचं आणि मजेत नगरसेवकाचा मोठं नाव छापायचं हा नवीन ट्रेन पुण्यामध्ये प्रत्येक चौका चौकात किंवा दिशादर्शक बोर्ड वर पाहायला मिळतो. आम्ही आमच्या कष्टाचा पैसा पुण्याच्या विकासासाठी, भवितव्यासाठीच्या रुपाने भरतो आणि आमच्या पैशावर मनपात निवडून आलेले नगरसेवक जर मजा मारत असतील हे खपवून घेतले जाणार नाही. कोणत्याही भिंतीवर किंवा महानगरपालिकेच्या बोर्डवर नगरसेवकाचे नाव तात्काळ लावायचे, छापायचे बंद केले पाहिजे. आम्ही ते खपवून घेणार नाही. महापालिका आयुक्त, महापौर, खासदार, सगळे आमदार आणि पुण्याचे पालकमंत्री यांना विनंती की, पुणेकरांचा 'टॅक्स'रूपी भरलेला पैसा विनाकारण नगरसेवकांच्या नावाचा जागर (प्रचार) करण्यासाठी वापरू नये. अन्यथा... आम्ही टॕक्स भरणार नाही.

पुण्यात 'ठिगळांच्या रस्त्यामुळे मणक्याचा बाजार झालेला आहे.' पाठीचा मणका अक्षरशः खिळखिळा झाला आहे. कारण विकासाच्या नावावर दररोज रस्त्याची काम होतात आणि रस्त्यांना तात्पुरत्या स्वरूपात वरवर ठिगळे लावून रस्ता खालीवर होत चालला आहे. त्यामुळे खड्ड्यांचे रस्ते अशीच नियोजित परिस्थिती आहे. मनपात टॕक्स रुपी जमणाऱ्या पैशांच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचे राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे. शहरातील बऱ्याच भिंतींवर वेगवेगळे 'चित्र' चांगल्या पद्धतीने काढण्याचा उपक्रम सुरू आहे. मात्र जिथं तिथं नगरसेवकांचे नाव छपाईची गरज नाही. विकास करायचा असेल तर लोकांच्या हिताचा झाला पाहिजे असे कुठेही चित्र दिसत नाही. रस्त्यावर कचरा, अर्धवट असलेली कामे, सहा महिन्यात एका रस्त्याचे दोनदा काम होते, तीनदा फूटपाथ दुरुस्तीच्या नावाखाली उखडून टाकले जातात आणि परत काम केलं जातात. स्पीड ब्रेकर, डिव्हायडर हे फक्त नावाला तोडलेले आहेत. दहा मीटर वर दोन वेळेस खड्डे असतात इतकी रस्त्यांची बिकट परिस्थिती असल्यामुळे मणाका खिळखीळा झाल्या सारखी परिस्थिती आहे. मात्र टक्केवारीच्या नादात गुंतलेले माननीय लोकप्रतिनिधी व कारभारी लोक पुणेकरांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत.  तुमच्या हितासाठी आमचा जन्म झालेला नाही.

'सेव्हन लव्ह' चौकातील उड्डाणपुलावर "स्वच्छ पुणे... श्री श्रीनाथ भिमाले... सुंदर पुणे..." असं लिहिलं गेलेला आहे. यामध्ये पुण्याचं हीच आहे का...? स्वच्छ पुणे आहे...? का सुंदर पुणे आहे का...? हे तपासण्याची गरज आहे. स्वच्छ पुणे व हरित पुणे हे माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी चांगल्या स्वरूपात दिलेली स्लोगन आणि केलेला विकास आज पाहिला मिळत नाही. मला नक्की माहिती आहे की, त्यांनी शहरांमध्ये महापालिका अंतर्गत पुण्यामध्ये जे 'हरित पुणे' केले होते. त्यावेळी मा. खा.  सुरेश कलमाडी यांनी कुठेही स्वतःचे नाव लावलेले नव्हते. मी त्यांचा समर्थक नसलो तरी जुन्या लोकांच्या कामाचा आदर्श घ्यायला हरकत नाही. स्वतःची निष्क्रिय पणाची कारभाराची चौकट झटकण्यासाठी कार्यक्षम पणाचा खोटा मुखवटा दाखवण्यासाठी नगरसेवक सरसगट स्वतःचं नाव टाकतात आणि तो प्रत्येक कामात टक्केवारीच्या रूपाने पैसे कमवतात यापेक्षा दुसरा कुठलाही कारभार नाही. त्यामुळे मा. महापालिका आयुक्तांनी सक्तीचा आदेश काढून पुण्यातील सर्व नगरसेवकांची, रस्त्यांवरची भिंतीवरची किंवा दिशादर्शक बोर्डवरची नगरसेवकांची नावे तात्काळ हटवावीत... अशी मागणी पुणेकर म्हणून करत आहे. अन्यथा... आम्ही 'टॕक्स' भरणार नाही.असे शिंदे यांनी म्हटले आहे

Post a comment

0 Comments