मुलाने नाश्ताची हातगाडी लावली नाही म्हणून वडिलांची आत्महत्या

उल्हासनगर : स्वत:च्या मुलाने रोजच्याप्रमाणे एक दिवस नाश्ता विक्रीची हातगाडी लावली नाही, म्हणून वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कल्याण – मुरबाड मार्गावरील पांजरपोळ गावाच्या हद्दीतील रायते पुलाजवळ ही घटना घडली. मोहनदास मुरली जमाई (५५) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
मोहनदास जमाई हे उल्हासनगर कॅम्प नंबर २ परिसरातील खेमणी भागातील एका इमारतीत कुटुंबासह राहतात. त्यांचा मुलगा अनिल (३१) हा कुटुंबाच्या उदरर्निवाहसाठी घराजवळच हातगाडीवर नाश्ता विक्रीचा छोटासा व्यवसाय करतो. मात्र गुरुवारी ५ नोव्हेंबरला अनिलने काही कारणामुळे नाश्ता विक्रीची गाडी लावली नाही.यामुळे त्याचे वडील मोहनदास जमाई प्रचंड निराश झाले. त्यानंतर त्यांनी 6 नोव्हेंबरला कल्याण-मुरबाड मार्गावरील कल्याण तालुक्यातील पांजरपोळ गावच्या हद्दीत असलेल्या रायते पुलाखाली नदी पात्रात उडी घेत आत्महत्या केली.

Post a comment

0 Comments