इंदोरीकर महाराजांच्या खटल्यातून सरकारी वकिलांची माघार, नवा वकील नेमण्याची अंनिसची मागणी

अहमदनगर: प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी वकीलपत्र मागे घेतल्याने आज होणारी सुनावणी पुढे ‌ढकलण्यात आलीय. आता 2 डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
कीर्तनातून पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग केल्या प्रकरणी इंदोरीकरांवर संगमनेर सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलांचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने सरकारी वकील कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a comment

0 Comments