न.प.स्वच्छता व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी आमरण उपोषण सुरू.पैठण, दि. ९ : पैठण नगर परिषद येथील कर्माचारी यांनी थकीत वेतन देण्या संदर्भात नगर परिषदे समोर आमरण उपोषणाचा पर्याय निवडला असून त्यामुळे दैनंदिन स्वच्छतेचा आणि पाणी पुरवठ्याचा ऐन सणा सुदीच्या काळात प्रश्न निर्माण झाला आहे. माहे ,जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०२० चे थकीत वेतन असल्या मुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी खाजगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते. तसेच निवृत्त व मयत कर्मचाऱ्याच्या वारसावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यात संतापाची लाट निर्माण झाली असून त्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाचे लोकशाही मार्गाने हत्यारचं उपसले आहे.
अद्याप पर्यंत अनुकंपाभर्तीवर कार्यालयाने नियुक्त्या केल्या नसल्याने नाराज अनुकंपाधारक अर्जदारही संतापले असून त्यांनीही या आमरण उपोषणास पाठींबा दिला आहे.
वारंवार स्मरणपत्रे देऊन ही कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत प्रशासनाने कुठलीही दखलन घेतल्याने दि.७.११.२०२० रोजी पासून शिवाजी पुतळा परिसर पैठण समोर आमरण उपोषणास बसले आहेत. या वेळी डेमोक्रेटिक कर्मचारी व कामगार युनियन चे भीमराव नावगिरे, उपाध्यक्ष दगडू यादव पगारे, सदस्य मारोती पुंजरं गालफाडे, खलील धांडे, किशोर लांडगे, रमेश जाधव, दारासिंग साळवे, कडुबाळ मगरे, किसन नावगिरे, सुमन तुसमकर, लताबाई साळवे, व्यंकटी पापुलवर, भगवान कुळकर्णी, राम कांदवने, आसाराम देवकर, नारायण नाटकर, शांताबाई गायकवाड, बबनबाई घोडके, विमल चांडाळे, विमल दुलगज, नवनाथ जगधने, रवींद्र पगारे, सचिन ससाणे यांच्या सह ८० कर्मचाऱ्यांनी उपोषणास पाठिंबा देत काम बंद आंदोलन केले आहे.

Post a comment

0 Comments