श्रीवर्धन मध्ये मानसिक वीक्रुतीचा कळस .जळत्या चितेतून मानवी मांस काढून खाण्याचा प्रकार!
 श्रीवर्धन, दि. ४ बुधवार : शहरातील स्मशानभूमी मध्ये चीतेला अग्नी दिल्यानंतर काही वेळानंतर मानवाचे मांस  इतरत्र पडण्याचे  चित्र पहावयास मिळत होते. हे क्रूत्य कोण करत आहे हे पाहण्याचे श्रीवर्धन मधील जागरूत नागरिकांनी ठरविले होते. चीतेला अग्नी दिल्यानंतर काही नागरिक तिथेच दबा धरून बसले असता. एक इसम हातात असलेल्या लाकडी काठी व लोखंडी शिगेच्या सहाय्याने चीतेतील मानवाचे मांस काडून खात असल्याचे निदर्शनास आले. त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन  करण्यात आले. सदर व्यक्तीवर श्रीवर्धन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून न्यायालीन कोठडी देण्यात आली आहे. सदर व्यक्ती समुद्र किनारी मठाचा गवंड इथे वास्तव्य करत असून  नग्न अवस्थेतही फिरत असल्याची चर्चा नागरिकांमधे आहे. यावर नगरपालिका प्रशासन  काय उपाय योजना करते याकडे लक्ष लागले आहे.

Post a comment

0 Comments