सततच्या पावसामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्या युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज लोळगे, निवेदनाद्वारे चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडे केली मागणी.पैठण, दि. ९ :

महाराष्ट्र सह पैठण तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे अति वृष्टी निर्माण होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुष्काळ , नापिकी, कर्जबाजारी, महागाई इत्यादी विषारी घटक शेयकर्यांच्या जीव घेत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या हा शेतीप्रधान भारत देशात लाजिरवाना प्रकार आहे, तसेच कृषीप्रधान देशाला लागलेला हा शाप आहे. राज्य सरकारचे चुकीचे धोरण व दिरंगाईमुळे शेतकरी पार कोलमडून गेला आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील शेकर्यांची व्यथा सरकार दरबारी मांडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा  पैठणचे नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी ८ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केले आहे. 
निवेदनात म्हटले आहे की, ३३ % नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळणार असा शासन निर्णय आहे. कित्येक शेतक -यांचे ५० % ते १०० % पर्यंत नुकसान झालेले आहे . परंतु पंचनामे न झाल्या कारणाने सदरील बाधित शेतकरी नुकसान भरपाई पासुन वंचित राहण्याची शक्यता आहे . तरी पुन्हा पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी तसेच राज्य सरकारने प्रति हेक्टरी जाहीर केलेली मदत म्हणजे शेतक - यांची निव्वळ थट्टा केलेली असुन सदर मदत ही वाढवुन देण्यात यावी. बागायत / फळबाग क्षेत्र व बाधीत शेतक-यांची संख्या ही कमी दाखवण्यात आलेली आहे, त्यामुळे नुकसान भरपाई पासून बहुतांश शेतकरी वंचित राहतील. अशा शेतक-यांना पुन्हा पंचनामे करुन मदत देण्यात यावी. एखादे गावाच्या क्षेत्रापैकी जर ३३ % अतिवृष्टीने बाधित झाले असेल तर अशा गावांना नुकसानग्रस्त गाव म्हणुन घोषीत करुन सरसकट गावातील शेतक - यांना भरीव मदत देण्यात यावी. सरकारी आकडेवारी नुसार बागायत क्षेत्रातील नुकसान ५४० हेक्टर एवढेच दाखविण्यात आले आहे . वास्तविक पाहता बागायत क्षेत्रात यापेक्षाही मोठे नुकसान झाले आहे . या बाबत पुन्हा पंचनामे करुन मदत मिळावी. तरी आपण पैठण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतक-यांच्या व्यथा आपल्या माध्यमातुन शासन दरबारी मांडुन शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवुन द्यावी आदी मागण्याचे निवेदन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा  पैठणनगरीचे युवा नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी दिले आहे.

Post a comment

0 Comments