लालू प्रसाद यादव यांचा नितीशकुमार व भाजपावर निशाणा

बिहार :- बिहारचे माजी मुख्यमंत्री व राजदचे सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांनी सहायक प्राध्यपक नियुक्तीत  भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या व्यक्तीस शिक्षणमंत्री बनवण्यात आल्यावरून, मुख्यमंत्री नितीश कुमार व भाजपावर निशाणा साधला आहे. लालू यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ''दुर्देवं पाहा जे भाजपावाले कालपर्यंत मेवालालचा शोध घेत होते, आज मेवा मिळाताच त्यांनी मौन बाळगलं आहे.
तसेच, लालू यांनी देखील असे देखील म्हटले की, तेजस्वी जिथं पहिल्याच कॅबिनेटमध्ये पहिल्या स्वाक्षरीनिशी १० लाख नोकऱ्या देण्यासाठी कटिबद्ध होते. तिथं नितीश यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये नियुक्तीत घोटाळा करणाऱ्या मेवालाल यांना मंत्री बनवून आपली प्राथमिकता दर्शवली आहे.

Post a comment

0 Comments