गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

गंगापूर प्रतीनीधी( प्रकाश सातपुते) 

गंगापूर तालुक्यातील तादुंळवाडी येथील एका 50 वर्षीय शेतकऱ्यांने शेतात गट क्रमांक 78 मधे घरासमोरील असलेल्या सेड मधील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करत जिवन यात्रा संपवली असुन
संजय विठ्ठल खरातकर वय 50  वर्ष   त्याचे नाव आहे ही घटना 5 नोव्हेंबर रोजी  मध्यरात्री घडली आहे
    पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी येथील संजय विठ्ठल खरातकर हा पत्नी दोन मुले एक मुलगी कुटुंबासह शेतात गट क्रमांक 78 राहत होता दोन दिवसापूर्वी संजय आणि काही गावातील इतर गावातील पाच सहा जणा सोबत भांडण झाले होते या भांडणात संजय यास तोंडाला , इतर ठीकाणी जखमा झाल्या होत्या झालेल्या भांडणासह इतर कारणांमुळे संजय याने घरासमोरील शेड मधील असलेल्या अँगलला दोरी बांधून आत्महत्या करत जिवन यात्रा संपवली आ या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे संजय याची परिस्थिती अंत्यत हलाखीची होती 
   घटनेची माहिती मिळताच शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर ,ऊपनिरीक्षक अमोल ढाकणे, काँ अनील दाभाडे, मनोज औटी, पोलीस नाईक रामकृष्ण कवडे,हेड. काँ अमोल करवंदे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रेतास  नातेवाईकांच्या मदतीने लासुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी तपासून मृत घोषित करून श्ववविच्छेदन करण्यात आले संजय खरातकर याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणी शिल्लेगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऊपनिरीक्षक अमोल ढाकणे आदी करत आहेत

Post a comment

0 Comments