राज्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी मोफतच.

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा खर्च स्थानिक प्रशासन करणार असून शासकीय केंद्रात आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच, शाळेतील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा सर्व खर्च स्थानिक प्रशासन करणार आहे.

मुंबई : राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत हजर राहण्या आगोदर कोरोना चाचणी करणे बंधंणकारक करण्यात आले आहे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा खर्च स्थानिक प्रशासन करणार असून शासकीय केंद्रात आरटीपीसीआर चाचणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच, शाळेतील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा सर्व खर्च स्थानिक प्रशासन करणार आहे, असे पत्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी काढले आहे.


मंगळवारपासून शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरूवात झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनांमुळे शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. शालेय विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी आज एक पत्र जारी केले असून, चाचणीसंदर्भात तसेच कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या खर्चाबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.

Post a comment

0 Comments