गुजरातमध्ये ट्रक-कंटेनरच्या भीषण अपघातात १० जण जागीच ठार, १७ जण जखमी.

गुजरातमध्ये बडोद्यात ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
बडोदा - गुजरातमध्ये बडोद्यात ट्रक आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. 

बडोद्यातील वाघोडीया क्रॉसिंग हायवेजवळ आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सूरत येथील एक कुटुंब आपल्या नातेवाईकांसह पावगड येथे दर्शनाला जात होते. 
वडोदरा राष्ट्रीय महामार्गावरील वाघोडिया चौकात पोहोचले असता भरधाव आयशर टेम्पो आणि कंटेनरची समोरसमोर जोरात धडक झाली. 
हा अपघात इतका भीषण होता, की टोम्पोमध्ये समोर बसलेले तरुण जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. 
जखमींना तातडीने एसएसजी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 10 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. 
मृतदेहांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांनी अपघाताची माहिती देण्यात येत असल्याचंही पोलिसांनी सांगितले.
या दुर्घटनेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दुःख व्यक्त केले असून त्यांनी ट्विट केले आहे. 'बडोद्याजवळ रस्ता अपघातामुळे मृत्यू झाल्याचे ऐकून दुःख होत आहे. 
प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत. तसेच, मृत्यू झालेल्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो.'

Post a comment

0 Comments