प्रभूदेवा चढणार बोहल्यावर! भाचीशी नव्हे, तर फिजिओथेरपिस्टसोबत करणार लग्न.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या नावांपैकी एक नाव म्हणजे प्रभूदेवा. आपल्या तालावर अनेकांना नाचायला लावणाऱ्या या नृत्यदिग्दर्शकाची लोकप्रियता काही कमी नाही. उत्तम नृत्यदिग्दर्शक, दिग्दर्शन आणि अभिनेता अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्यातील चुणूक दाखवणारा प्रभूदेवा कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून प्रभूदेवाच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याची पर्सनल लाइफदेखील चांगलीच चर्चेत आली आहे. प्रभूदेवा लवकरच पुन्हा एकदा लग्नाची बेडीलत अडकणार असल्याचं ‘इंडिया टुडे’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
मध्यंतरी प्रभूदेवा त्याच्या भाचीसोबत लग्न करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या सगळ्या अफवा असून प्रभूदेवा मुंबईतील एका फिजीओथेरपिस्टसोबत लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये ही जोडी लग्न करणार आहे.
पाठीला दुखापत झाल्यामुळे प्रभूदेवा या फिजीओथेरपीस्टकडे उपचार घेत होता. त्याच काळात या दोघांचं सूत जुळलं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी प्रभूदेवा आणि त्याच्या भाचीच्या रिलेशनच्या चर्चा रंगल्या होत्या.मात्र, त्या सगळ्या अफवा असल्याचंदेखील सांगण्यात येत आहे.
दरम्यान, यापूर्वी प्रभूदेवाने १९९५ मध्ये रामलतासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र, नयनतारामुळे या दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०११ मध्ये प्रभूदेवा आणि रामलता यांनी कायदेशीरित्या घटस्फोट घेतला

Post a comment

0 Comments