आयपीएल इतिहासात रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचा ठरला शिल्पकार.

‘हिटमॅन’ रोहित शर्मा, आयपीएलच्या इतिहासात यशस्वी खेळाडू आणि कर्णधार.

मुंबई : मुंबई इंडियन्सने  दिल्ली कॅपिटल्सवर आायपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात  5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने 51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली.

आायपीएल 2020 च्या अंतिम सामन्यात  मुंबई इंडियन्सने  दिल्ली कॅपिटल्सवर  5 विकेट्सने शानदार विजय मिळवला. रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. रोहितने 51 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 68 धावांची विजयी खेळी केली. 


मुंबईने विजेतेपद पटकावण्याची ही 5 वी वेळ ठरली. मुंबईकर रोहितने या 5 ही वेळा आपल्या नेतृत्वात मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं. रोहित हा आयपीएलमधील यशस्वी खेळाडू आणि एकमेव कर्णधार आहे. 
आयपीएलच्या इतिहासात रोहितने असाधारण कामगिरी केली आहे. या निमित्ताने रोहितने आयपीएल कारकिर्दीत केलेली लक्षणीय कामगिरी पाहणार आहोत. रोहित हा आयपीएलमधील एकमेव यशस्वी खेळाडू आणि कर्णधार आहे. रोहित आतापर्यंत एकूण 6 वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात खेळला आहे. 

 रोहित 1 वेळा खेळाडू तर 5 वेळा कर्णधार म्हणून अंतिम सामन्यात खेळला आहे. या सहाही वेळा तो यशस्वी झाला आहे. रोहित 2009 मध्ये हैदराबादकडून खेळत होता. तेव्हा अंतिम सामना हैदराबाद विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला होता. या अंतिम सामन्यात हैदराबादने बंगळुरुवर विजय मिळवला होता.

Post a comment

0 Comments