ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक, ज्यांना राजकारण करायचंय त्यांना करु द्या - अनिल परब

मुंबई : “मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकार सकारात्मक पावले उचलत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांना कुणाला राजकारण करायचं असेल त्यांना ते करु द्या, समाजाच्या महत्त्वाच्या प्रश्नावरुन राजकारण करुन काही साध्य होणार नाही. शेवटी मराठा समाजाला न्याय मिळणे महत्त्वाचे आहे”, असं शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
मराठा आंदोलकांना मी स्वत: जाऊन भेटलो आहे. त्यांचं निवेदन स्वीकारुन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील पाठवलं आहे. निवेदनात केलेल्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहे. सरकार नक्कीच यासंदर्भात सकारात्मक विचार करेल, ज्यांना कुणाला राजकारण करायचे असेल त्यांनी ते करावं. सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा आहे. सरकार मराठा आरक्षणाबाबत प्रमाणिक आहे”, असं अनिल परब म्हणाले.

Post a comment

0 Comments