जिल्हाधिकारी कार्यालयात युवा कार्यक्रमसल्लागार समितीची बैठक संपन्न.औरंगाबाद, दि.२५ बुधवार :  भारत सरकारच्या औरंगाबादेतील नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्ह्यात विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक संकल्प शुक्ला यांनी यंदा घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.
 बैठकीस कौशल्य विकास विभागाचे एन. एन. सुर्यवंशी, बी. आर. रिठे, घाटीचे डॉ. खडसे, राष्ट्रीय छात्र सेनेचे कर्नल बर्वे उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी लेखाधिकारी वसंत सुर्वे, युवा स्वयंसेवक प्रकाश त्रिभुवन, कोमल प्रधान, रामेश्वर कोलते, रामेश्वर जाधव, अर्चना खोमने, रोहिनी लोंढे यांनी पुढाकार घेतला. 
*****

Post a comment

0 Comments