लाथो के भूत बातों से नही मानते… आदेशानंतर संघर्ष करावाच लागेल; मनसे नेत्याचा सरकारला इशारा

मुंबई :- कोरोना काळातील वाढीव वीज देयकांतून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्दय़ावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घूमजाव केले. वीज कंपन्या चुकीचे देयक देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार, हे कसे चालेल, असा सवाल करत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने राऊत यांची सवलतीची मागणी फेटाळली. त्यामुळे वीज सवलत मिळण्याची शक्यता मावळल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान, यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऊर्जामंत्र्यांवर टीकाही करण्यात आली होती. आता मात्र मनसेनं संघर्ष करावाच लागेल असं म्हणत इशारा दिला आहे.
"वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण लाथो के भूत बातों से नही मानते," असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.

Post a comment

0 Comments