बहीण रागवली म्हणून घर सोडून रेल्वे पटरीने सुरू केला प्रवास.


औरंगाबाद/करमाड -  आई वडील पुणे येथे मोलमजुरी ची काम करतात. तर मुलगा हा लेकजवाई यांच्या कडे शिक्षण घेण्यासाठी ठेवले होते.
पवनपुत्र साखळकर वय 13 वर्ष हा आज दुपारी बहीण रागवली म्हणून दुपारी 2 वाजे दरम्यान एका पिशवीत कपडे घालून चिकलठाणा रेल्वे स्टेशन मार्गे पटरीने पायी चालत जाऊन करमाड रेल्वे स्टेशनवर पोहचला. 

थकल्या मुळे रेल्वे स्टेशनवर एका कोपऱ्यात एक अल्पवयीन मुलगा बसला असल्याची माहिती रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना मिळाली.
ही माहिती रेल्वे नियंत्रण कक्ष उपप्रमुख विश्वासराव गिरगावकर यांना देऊन त्यांनी तात्काळ स्टेशन मास्तर इम्रान शेख कळवून या मुलास स्टेशन वर आणले 
यावेळी रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांनी ही माहिती RPF PI अरविंद शर्मा यांना देताच त्यांनी रेल्वे सुरक्षा बल चे कर्मचारी हनुमान मीना यांना सोमाणी सोबत करमाड कडे रवाना झाले.
घटनेची माहिती ही करमाड PI खेतमाळस सर यांना दिल्याने त्यांनी तात्काळ कर्मचारी पाठवुन त्या मुलास करमाड पोलीस ठाण्यात आणलं त्यामुलास विश्वास देताच त्याने नातेवाईक विषयी माहिती दिली 
नातेवाईक यांना पोलीस स्टेशनला बोलावून त्यांना मुलास रात्री 20:30 वा सुपूर्द केले.

Post a comment

0 Comments