भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं

पाटणा : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल आज  जाहीर होणार आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या मतमोजणीला सुरुवात होऊन दोन तास उलटले आहेत. सुरुवातीला महागठबंधनची घोडदौड पाहायला मिळत होती पण आता मात्र भापजनं मोठी उडी घेतली आहे. एनडीए’ने राजद-काँग्रेस  आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. 

बिहारमध्ये एनजीएलाला बहुमत मिळत असल्याचं दिसताच भाजप कार्यालयात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर बहुमताच्या दिशेने भाजप पुढे असल्याचं दिसताच पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबाद अशी घोषणाबाजी सुरू झाली आहे. यावेळी विरोधी पक्षाचा निषेधही करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments