सातबारा वर नाव लागत नाही तोपर्यंत आमरण उपोषण-माजी सैनिक पाईकरव.वैजापूर, दि. ५ गुरुवार : वैजापूर तालुक्यातील डवाळा येथील माजी सैनिक दीपक पाईकराव यांनी जोपर्यंत जमिनीच्या सातबारा उतारावर नाव लागत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना कळवले आहे.

सविस्तर वृत्त असे की डवाळा येथील गट नंबर 179 मधील गायरान जमीन माजी सैनिक दीपक पाईकराव यांना दिनांक 29 सप्टेंबर 1999 ला देण्याबाबत ठराव पास करण्यात आला होता परंतु संबंधित तलाठी त्या जमिनीच्या सातबारा वर नाव लावतं नसल्याने व टाळाटाळ करत असल्याने माजी सैनिकास मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.ज्या सैनिकाने आपले पूर्ण आयुष्य भारत मातेच्या रक्षणासाठी आपले आयुष्य पणाला लावले त्यांना संबंधित तलाठी उडवा उडवी ची उत्तरे देत असल्याचे सादर निवेदनात म्हटले आहे.म्हणजे माजी सैनिकाला आता सातबाऱ्यावर नाव आणण्यासाठी आमरण उपोषण करावे लागते ही मोठी शोकांतिका आहे.11 नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असून जोपर्यंत नाव सातबाऱ्यावर येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे निवेदनाद्वारे माजी सैनिक दीपक पाईकराव यांनी म्हटले आहे.

Post a comment

0 Comments