पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्यास मराठवाड्यात शिवसेनेला बळ मिळेल - खासदार हेमंत पाटील

नवी दिल्ली : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाची निमंत्रणं सुरुच आहेत. शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनीही पंकजांना सेनेत आवताण दिले आहे. हेमंत पाटलांसह शिवसेनेचे पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची भेट घेऊन पंकजांना सेनेत बोलवण्यासाठी विनंती करणार आहेत. 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये मान मिळत नाही. पंकजा मुंडे शिवसेनेत आल्यास त्यांचं स्वागतच आहे. पंकजा मुंडे यांना शिवसेनेत आणण्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत. पंकजा मुंडे शिवसेनेमध्ये आल्यास मराठवाड्यात शिवसेनेला बळ मिळेल.

Post a comment

0 Comments