त्याच्या कानाखाली जो शॉक बसेल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'; मनसेचा इशारा

मुंबई: कोरोना काळात सर्वसामान्य लोकांना विज मंडळाने पाठवलेली हजारो रूपयांची बिले कमी करण्यात यावी यासाठी मनसेकडून आज आंदोलन हाती घेण्यात आले आहे. राज्यभरात वीजबिलाविरोधात महामोर्चा काढण्यात आला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा अनेक प्रमुख शहरांमध्ये मनसेचे शेकडो कार्यकर्ते वीजबिलमाफीची मागणी करत रस्त्यावर उतरले आहेत.  राज्य सरकारने अनेक वेळा आश्वासन देवूनही विज बिलात कोणत्याही प्रकारची सूट मात्र अद्याप दिलेली नाही. 
कोरोना काळात आधीच लोकांच्या नोकऱ्या गेल्या असताना पाठवण्यात आलेली हजारो रूपयांची बिले भरायची कशी असा प्रश्न गोरगरीबांना पडला आहे. त्यामुळे सरकारने त्वरित विज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मनसेने केली आहे.  मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने अनेक ठिकाणी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. तरीही मनसेचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. ठाण्यात मनसेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे देखील समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

Post a comment

0 Comments